breaking-newsक्रिडा

बांगलादेश – वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : बांगलादेशची वेस्ट इंडिजवर मात

तमिम इक्बाल आणि शाकिब-अल-हसन यांच्या विक्रमी दोनशे धावांची भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ४८ धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत बांगलादेशने ४ बाद २७९ धावा केल्या. सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या तमिमने नाबाद १३० धावा काढताना बांगलादेशतर्फे वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा मान मिळवला. त्याने शकिबसह दुसऱ्या विकेटसाठी तब्बल २०७ धावांची भागीदारी रचली. शतकाच्या अगदी जवळ येऊन शकिब ९७ धावांवर बाद झाला.

२८० धावांचे लक्ष्य गाठताना वेस्ट इंडिजचा संघ ९ बाद २३१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्या शिमरॉन हेटमेयरने ५२ धावा करताना संघाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले.  कर्णधार मशरफी मोर्तझाने चार बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : ५० षटकांत ४ बाद २७९ (तमिम इक्बाल नाबाद १३०, शकिब-अल-हसन ९७; देवेंद्र बिशू २/५२ वि. विरुद्ध वेस्ट इंडिज : ९ बाद २३१ (शिमरॉन हेटमेयर ५२, ख्रिस गेल ४०; मशरफी मोर्तझा ४/३७).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button