breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
बहुजन समाज पार्टीच्या शहराध्यक्षपदी सुरज गायकवाड
पिंपरी / महाईन्यूज
बहुजन समाज पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी सुरज चंद्रकांत गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. पुणे येथील आंबेडकर सांस्कृतिक भवनात बहुजन समाज पार्टीच्या संगटन बांधणी मेळाव्यात प्रदेश प्रभारी प्रमोद रैना व प्रदेशाध्यक्ष ऍड. संदिप ताजणे यांच्या हस्ते गायकवाड यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
सुरज गायकवाड हे गेल्या साडेतीन वर्षांपासून बसपामध्ये सक्रीय आहेत. त्यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 निगडी परिसरातून लढविली आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमधील फुले शाहू आंबेडकर चळवळीत सक्रियपणे काम करीत आहेत.