breaking-newsराष्ट्रिय

बसमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे, विकृत तरुणाला अटक

दिल्लीतील बसमध्ये एका तरुणीसमोर हस्तमैथून करणाऱ्या विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणाचे बसमध्ये अश्लील चाळे सुरु असताना अन्य प्रवासी मदतीला आले नाही, अशी खंत तरुणीने व्यक्त केली आहे. या घटनेने दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दिल्लीत राहणारी तरुणी एका महाविद्यालयात शिकते. मंगळवारी ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावर बसने प्रवास करत होती. बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या आसनावर तरुणी बसली होती. यादरम्यान एक तरुण तिच्या समोरच्या आसनावर येऊन बसला. तो विकृत तरुण तरुणीसमोरच हस्तमैथून करु लागला. हा प्रकार सुरु असताना बसमध्ये काही प्रवासी होते. मात्र, ते देखील तरुणीच्या मदतीला आले नाही. शेवटी तरुणीने त्या विकृत तरुणाला धडा शिकवण्याचे ठरवले. तिने विकृत तरुणाला चोपायला सुरुवात केली. तसेच फोनवरुन घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या पथकाने तरुणाला अटक केली आहे.

दिल्लीत यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही विकृताने बसमध्येच तरुणीसमोर हस्तमैथून केल्याची घटना घडली होती. तरुणीने हा प्रकार कॅमेऱ्यात शूट करुन सोशल मीडियावर टाकला आणि त्या तरुणाची रवानगी तुरुंगात झाली होती. त्या तरुणीनेही अन्य प्रवासी मदतीला आले नाही, अशी तक्रार केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button