breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरल्यास महिन्याभरात फासावर लटकवा – खासदार नुसरत जहां

महाईन्यूज | दिल्ली

तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण आणि उन्नावमधील बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याच्या घटनेमुळे देशात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिवसेंदिवस महिलांसोबत घडणाऱ्या आत्याचाऱ्याच्या घटनेमुळे देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनांनंतर सर्वसामान्यांपासून राजकीय क्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन विश्वातील अनेक जणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

अशातच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी गुन्हा सिद्ध झाल्यास बलात्काऱ्यांना महिन्याभरात फासावर लटकावा असा सल्ला दिला आहे.खासदार नुसरत जहां यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त करत गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीचा उपाय सुचवला आहे. ‘नाही म्हणजे नाहीच. कायदा कितीही कठोर असला तरी प्रशासन आणि पोलिसांनी जबाबदारीने वागायला हवं. जामीन नको. माफी नको. दोषी ठरल्यास एका महिन्यात फासावर लटकवा’ असं ट्विट नुसरत जहां यांनी केलं आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button