breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘बधाई हो’च्या सीक्वलमध्ये भूमी पेडणेकर व राजकुमार रावची जोडी

‘बधाई हो’ २०१८ सालच्या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे…आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, निना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला  ‘बधाई हो’ २०१८ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक  ठरला होता. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आयुष्मान सान्या नाही तर भूमी पेडणेकर व राजकुमार रावची जोडी पाहायला मिळणार अशी चर्चा आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार भूमी या चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे तर राजकुमार महिला पोलिस ठाण्यात असलेल्या एकमेव पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे  भूमी आणि राजकुमार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे.

”मला आवडलेल्या चित्रपटांपैकी ‘बधाई हो’ हा एक चित्रपट आहे, मला या चित्रपटाच्या सीक्वलसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी कोणताही विचार न करता झटक्यात होकार दिला. मी आणि राजकुमार पहिल्यांदा एकत्र काम करत आहोत त्यामुळे मी त्याच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे” असं भूमी म्हणाली. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button