breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बंजी जम्पिंग करताना इन्स्ट्रक्टरने दोरी न लावताच तरुणीला ढकलले

मुंबई : थ्रील काय असते याचा अनुभव रोलर कोस्टर राईड, बंजी जम्पिंग, पॅराग्लायडिंग केल्यानतंर येतो. परंतु हे करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते, अन्यथा ते जिवावरही बेतू शकते. सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. थ्रील अनुभवण्यासाठी खबरदारी घेणं किती आवश्यक आहे, ते यावरुन दिसते.

उंच दरीच्या टोकावरुन बंजी जम्पिंग करण्यासाठी ही तरुणी तयारीत असल्याचे दिसते. तिच्यामागे इन्स्ट्रक्टरही उभा असलेला दिसत आहे. इन्स्ट्रक्टर या तरुणीला दरीत ढकलून देतो. मात्र, पुढच्याच काही सेकंदात त्याला आपली चूक लक्षात आली.

तरुणीला खाली ढकलून देताना सुरक्षेसाठी आवश्यक असलेला दोरखंड (रोप) तिला बांधला नव्हता. रोप वरच्या बाजूला तसाच लटकत असल्याचं पाहिल्यानंतर इन्स्ट्रक्टरला चूक लक्षात आली. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्या तरुणीचे पुढे नेमकं काय झालं, ही घटना नेमकी कुठली आहे, याबाबत अद्याप कोणताही तपशील मिळालेला नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button