breaking-newsआंतरराष्टीय

फ्रान्सकडून राफेल विमानांची पहिली तुकडी भारताकडे झेपावली

पॅरिस – बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून भारतात येण्यासाठी उड्डाण केले आहे. या पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात उतरतील. हरयाणातील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ असेल.

२०१६ साली भारताने फ्रान्स सरकारबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. त्यानुसार पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी आयएएफचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button