breaking-newsआंतरराष्टीय

फेसबुकने 115 खाती बंद केली

अमेरिकेतील मध्यावधी निवडणूकांच्या पार्श्‍वभुमीवर फेसबुकने 115 खातील बंद केली आहेत. प्रत्यक्ष व्यक्‍तीच्या माहितीशी विसंगत असलेली ही खाती विदेशातील गटांनी निवडणूकीत हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने तयार केली असावीत, अशा संशयातून ही खाती बंद करण्यात आली आहेत.

फेसबुइकतने 30 फेसबुक अकाउंट आणि 85 इन्स्टाग्राम अकाउंट बंद केली आहेत. या अकाउंटबाबत अधिक तपशील मिळवण्यासाठी तपास केला जात आहे, असे फेसबुकने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. इराणशी संबंधित 82 फेसबुक पेजही गेल्या महिन्यात बंद करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात अशीच 652 फेसबुक पेज बंद करण्यात आली होती. ही अकाउंट रशिया आणि इराणमधील गटांशी संबंधित असल्याचा संशय होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button