breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेरीवाल्यांनी स्वच्छ अभियानात सक्रिय व्हावे – काशिनाथ नखाते

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे फेरिवाल्याना स्वच्छतेची प्रतीज्ञा

पिंपरी | प्रतिनिधी

आपल्या व्यवसायाचे ठिकाण, आपले शहर पर्यायाने आपले राज्य स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान सुमारे चार वर्षापासून सुरु आहे. या अभियानाला विविध ठिकाणी   चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सहभागी होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेस सहकार्य करुन आपला नावलौकिक वाढण्यास मदत करावी. आपण करत असलेला व्यवसाय व अन्नन स्वच्छ  असावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले.

नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे प्राधिकरण निगडी येथे हातगाडी, टपरी, स्टॉल धारकाना स्वच्छतेची आवड व्हावी यासाठी  सर्वाना  स्वच्छतेची प्रतीज्ञा देण्यात आली. या वेळी नखाते बोलत होते.  या वेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी, निमंत्रक बाळासाहेब बोराडे, वृषाली पाटणे, सहदेव होनमने, लक्ष्मण मेहेर, बशीर रावल, फरिद शेख, अम्बालाल सुखवाल, फरिद शेख, विशाल रीटे, अशोक गुप्ता, समाधान मुसळे, सुनिता जाधव, रामा बिरादार आदी उपस्थित होते.

या वेळी मी स्वच्छता ठेवेण, मी कचरा इतरत्र टाकणार नाही, इतरांना करु देणार नाही. मला खात्री आहे की मी स्वच्छतेकडे नेणारा प्रत्येक पाउल माझ्या राज्याला देशाला स्वच्छ करण्यास मदत करेल”  अशी प्रतीज्ञा या विक्रेत्यांनी घेतली.

शहरातील सर्व परिसरात हे अभियान होणार असल्याची माहिती निमंत्रक किरण साडेकर, प्रकाश साळवे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button