Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘तुला खूप माज आला आहे का? म्हणत मारहाण, एकाला अटक

पत्नीशी संबंध असल्याच्या संशयावरून लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याची घटना गुरूवारी (दि.7) आसखेड बुद्रुक (ता. खेड) या ठिकाणी घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

राजेंद्र साहेबराव गाडे (रा. आसखेड बुद्रुक, ता. खेड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राकेश महादु गाडे (वय 34, रा. आसखेड बुद्रुक ( ता. खेड ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश गाडे गुरूवारी (दि.7) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास शेतीतील काम संपवून दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी आरोपी राजेंद्र त्याठिकाणी आला व ‘तुला खूप माज आला आहे का ? असे म्हणत आरोपीने लोखंडी कोयत्याने फिर्यादीस  मारहाण करत गंभीर दुखापत केली. चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button