breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेरीवाला सर्वेक्षण रद्द करावे

  • मनपाने ४८ लाखाची बचत करावी
  • महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाची मागणी.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे सन २००८,२००९ , २०१२, २०१४ साली पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाला सर्वेक्षण करण्यात आले यात सन २००८मध्ये साधारण ७६०० विक्रेत्यांची नोंद झाली या पुढील सर्वेक्षणामध्ये विविध ठिकाणच्या सर्वेमध्ये एकुण १०५८३ विक्रेते आढळूण आले. मात्र सन २००८ च्या नोंदीत विक्रेत्याना त्यात सामाउन घेतले नाही. त्यांमुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले. आधी यापुर्विच्या लाभार्थ्याना एकही लाभ मिळाला नाही आणी त्याना लाभ न देताच वंचित ठेउन त्यांचेही पुन्हा सर्वे करण्याचा घात मनपाने घातला असुन हा कोनाच्या फायद्यासाठी असा सवाल करत फेरीवाला सर्वे रद्द करुन मनपाच्या कर्मचारी यांचेकडुन सर्वे करुन ४० हजार विक्रेत्यांचे सुमारे ४८ लाख रुपयांची बचत करुन मनपाने ही रक्कम फेरीवाला कल्याणार्थ वापरावी अशी मागणी नैशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघा ने मनपा आयुक्तांकडे केली आहे , महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजु बिराजदार यानी निवेदन दिले आहे.

वाचा :-महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड-19 रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळणार मोफत

महानगरपालिकेकडून बयोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले. योग्य संस्थेची निवड न केल्यामुळे चुकिच्या संस्थेला काम दिल्यामुळे आणी ज्याना हे काम दिले त्यानी प्रत्यक्ष काम न केल्यामुळे केवळ ५९०० फेरीवाल्यांचे बयोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले.४१०० पेक्षा अधिक उर्वरित प्रतिक्षेत आहेत. या साठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत , बहुतांशी सुमारे २५ वर्षां पेक्षा अधिक काळापासून व्यवसाय करत आहेत त्याना शासनाचे कायद्यानुसार लाभ मिळावा या प्रतीक्षेत आहेत . शहर समितीला अंधारात ठेउन जात आहे . गुणवत्तापुर्ण काम करणारी संस्था/ एजन्सी ला काम न देता हितसंबंध असणा-याना काम देन्यात आल्यामुळे या सर्व अडचणीचा सामना सामन्य फेरिवल्याना करावा लागत आहे. मनपाने जाहिरात / निविदा काढून टेन्डर पद्धतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षंण, प्रमाणपत्र व ओळखपत्र असे एकुण दर चुकिचा असुन कोणालाही प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्याने या पुर्वीचा वाईट अनुभव पहाता हे कांम पुर्ण होणार नाही. यापुर्विच्या वेळी ज्या चुका झल्या त्या पुन्हा होताना दिसत आहेत.यात आपण लक्ष देउन यापुढे अर्धवट ,अयोग्य पद्धतीने होणा-या सर्वेक्षणाचे काम त्वरित थांबवण्याचे आदेश देन्यात यावेत . अन्यथा याबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button