breaking-newsक्रिडा

फिफा विश्वचषक : कोलंबिया टेस्ट’साठी जपान सज्ज

सारान्स्क – विश्‍वचषक स्पर्धेला केवळ 71 दिवस बाकी असताना मुख्य प्रशिक्षकांची हकालपट्टी करावी लागल्यामुळे हादरा बसलेला जपान संघ आज (मंगळवार) रंगणाऱ्या सामन्यात कोलंबियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध चाचणी देण्यास सज्ज झाला आहे.

विश्‍वक्रमवारीत 61व्या क्रमांकावरील जपानसाठी 16व्या स्थानावरील कोलंबियाचे आव्हान फारच कठीण असले, तरी मुख्य आक्रमक जेम्स रॉड्रिगेझची तंदुरुस्ती हा कोलंबियासमोरील पेच कायम आहे.

एप्रिल महिन्यात प्रशिक्षक वाहिद हालिल्होझिद यांना हटविल्यानंतर जपानला बाद फेरी गाठण्याची संधी नसल्याचे मत बहुतेक जाणकारांनी व्यक्‍त केले आहे. त्यामुळेच हे सर्व अंदाज चुकीचे असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी जपानवर येऊन पडली आहे. लेवान्डोव्हस्कीचा पोलंड आणि सेनेगल हे दोन दर्जेदार संघही एच गटातच असल्याने जपानला आज विजयी सलामीची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button