breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

धनंजय मुंडेचे मंत्री पद हूकणार, पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविणार

मुंबई|महाईन्यूज|

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर येण्यासाठी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी निमंत्रण दिलं आहे. पण धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद हुकण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या नावाला प्रदेशाध्यक्षपदासाठी पसंती दिली जाऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसरा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सभा गाजवणारे धनंजय मुंडे यांच्या नावाला पक्षातील अनेकांची पसंती आहे. धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वगुणांचा पक्षाच्या संघटनासाठी फायदा होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button