breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
प्लास्टिक, थर्माकॉल वापरणा-या व्यावसायिकांवर कारवाई
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने प्लास्टीक व थर्माकॉल बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून मोशी परिसरात आज शुक्रवारी (दि. 3) व्यावसायिकांकडून पाच हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, दोन किलो प्लास्टीक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.
क क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी आर. एम. भोसले, आरोग्य निरिक्षक वैभव कांचनगौडार व रवि गायकवाड यांच्या पथकाने देहू – आळंदी रस्त्यावरील मोशी चौक व प्रभागातील विविध दुकांनांमध्ये जावून प्लास्टीक व थर्माकॉलचा वापर न करण्याबाबत जागृती केली. तसेच, काही ठिकाणी प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढऴून आल्याने दोन किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून पाच हजार दंड आकारण्यात आला आहे.