breaking-newsमुंबई

प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपवर, प्रियकराला ‘सौदी’वरून परतताच अटक

प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिचे गुपचूप काढलेले अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या उपनगर अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सौदी अरेबियात असलेल्या आणि मायदेशी परतलेल्या २५ वर्षीय एजाज अहमद खान उर्फ आर्यन याला मुंबई विमानतळावर उतरताच अटक केली. न्यायालयाने त्याला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अंधेरी परिसरात कुटुंबासह राहणारी २७ वर्षीय पीडित तरुणी नरिमन पॉईंट येथील एका खासगी कंपनीत काम करते. २०११ ते २०१६ दरम्यान तरुणी आणि आरोपी एजाज यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यान नोकरीनिमित्त एजाज सौदी अरेबिया येथे गेला. तरीही दोघांमध्ये संवाद हा व्हिडिओ कॉल आणि स्काईपद्वारे साधला जायचा. या दरम्यान देशापासून आणि तुझ्यापासून लांब आहे, असे म्हणत एजाज आपल्या प्रेयसीला विवस्त्र होण्यास अनेकदा सांगत. ते चित्रीकरण एजाजने सेव्ह करून ठेवले. त्यानंतर एजाज हा विवाहित असल्याची माहिती तरुणीला समजली. त्यामुळे नंतर तरुणीने एजाजला प्रतिसाद दिला नाही. त्याचा फोन उचलणे बंद केले. याच रागातून आरोपी एजाजने प्रेयसीचे अश्लील चित्रण एका व्हॉट्सअप ग्रूपवर टाकले.

मे महिन्यात एजाजचा पीडित तरुणीला फोन आला. त्याने डॉट नावाचा एक व्हॉट्सअप ग्रूप असल्याचे सांगितले. या ग्रूपमध्ये पीडित युवतीचाही समावेश होता. ओलिसन नावाचा व्यक्ती या ग्रूपचा अॅडमिन आहे. या ग्रूपमध्ये पीडितेच्या नंबर व्यतिरिक्त तिचे मित्र आणि मैत्रिणी तसेच आजूबाजूच्या लोकांचा समावेश होता. अस्वस्थ झालेल्या तरुणीने शेजारच्या महिलेच्या व्हॉट्सअपवर तपासणी केली असता तिला धक्काच बसला. तिचे प्रेमसंबंध असलेल्या काळातील काही अश्लील व्हिडिओ या ग्रूपवर आढळले. प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी हेतुपुरस्पर ही बदनामी केल्याचे पीडित तरुणीच्या लक्षात येताच तिने अखेर मार्च २०१८ रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी एजाज अहमद खान उर्फ आर्यन याच्या विरोधात ३५४ (क), ५०० सह कलाम ६७ (अ) आयटी कलमानुसार गुन्हा दाखल केला. चौकशीत तरुणीने आरोपी एजाज हा सौदी अरेबियात असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी एजाजच्या अटकेची प्रक्रिया सुरु केली. पोलिसांनी प्रथम लुक आउट नोटीस काढली. त्यामुळे मुंबई पोलिसांसह विमानतळावरील सुरक्षा यंत्रणाही अलर्ट होती. सौदी अरेबियातून एजाज हा मुंबई विमानतळावर येताच त्याला पोलिसांनी अटक करुन ओशिवरा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आपण व्हॉट्सअपवर तरुणीचे अश्लील चित्रफीत टाकल्याची कबुली दिली. त्या तरुणीने मला दगा देत दुसऱ्या युवकाशी प्रेमसंबंध जुळवल्यामुळे तिला धडा शिकवण्याच्या आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने अश्लील व्हिडिओ टाकल्याची कबुली दिली. मंगळवारी आरोपी एजाजला वांद्रे स्थानिक न्यायालयात नेले असता, त्याला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button