breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘सुशांतची आत्महत्या नसून हत्या’;पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत चाललेल्या तपासात अनेक नविन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहे. सुशांतने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केल्याचे मानले जात असले तरी अद्यापही पोलिस ठोस अशा कुठल्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत. अशात सुशांतचे चाहते त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेत आहेत. यापैकीच एक म्हणजे पॅरानॉर्मल रिसर्च.

सुशांतच्या मृत्यूसंदर्भात एका पॅरानॉर्मल रिसर्चचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा केला जातोय. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात कॉस्मो पॅरानॉर्मल अ‍ॅण्ड घोस्ट हंटिंग सोसायटी ऑफ इंडिया-युके-युएसएच्या एका व्यक्तिने प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्ट शॉन लार्सन व ट्रासा लार्सनसोबत चर्चा केली. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

“आम्ही सुशांतच्या आत्म्यासोबत बोललो. यावेळी सुशांतने स्वत: त्याची हत्या झाल्याचं सांगितलं. सुशांतला कोणी मारले, हे सध्या आम्ही सांगू शकत नाही. पण सुशांतची हत्या करणारा एक पुरूष होता आणि हत्या करताना त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता, एवढे मात्र आम्ही सांगू शकतो. आम्ही लवकरच सत्य आणून काढून सुशांत व त्याच्या चाहत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.” असं एक्स्पर्टनी म्हटलं आहे.आता या दाव्यात किती तथ्य आहे हे नंतर समोर येईलच. पण अजूनही त्याचे चाहते त्याला विसरले नाही उलट त्याला न्याय देण्यासाठी झटत आहेत हे नक्कीच दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button