breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्रेम प्रकरणातून पिंपरीत 20 वर्षीय युवकाची हत्या

पिंपरी : प्रेम प्रकरणातून 20 वर्षीय युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. चार ते पाच जणांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पिंपळे सौदागर भागात रविवारी रात्री हा प्रकार घडला. चार ते पाच जणांच्या टोळक्याने 20 वर्षीय विराज जगतापला पुलावर गाठले. त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले. हल्ल्यात विराज गंभीर जखमी झाला होता.

पिंपरीतील खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतानाच काल (सोमवारी) दुपारी विराजने अखेरचा श्वास घेतला. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा सांगवी पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणी सहा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्यासह अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून इतरांचा शोध सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button