breaking-newsपुणे

प्रेमसंबंधावरुन विवाहितेच्या आत्महत्येनंतर पतीनंही संपवलं आयुष्य

पुणे – पूर्वीचे प्रेमसंबंध माहिती झाल्याने धमकावणाऱ्या दिराला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिराला अटक केली. दरम्यान, विवाहितेच्या पालकांनी 5 लाख रुपयांची मागणी केल्यानं तिच्या पतीनंही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या जोडप्यानं आंबेगाव येथील राजयोग सोसायटीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सागर शिळीमकर (वय ३२ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. सागरच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विवाहितेची आई-वडील, काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सागरची पत्नी गितांजली प्रियकरासोबत सागरच्याच फ्लॅटमध्ये असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यावरुन गितांजलीने सागरशी भांडण करुन 24 सप्टेंबरला आत्महत्या केली होती. त्यानंतर गितांजलीची आई जयश्री पवार यांना सागरचा दीर सुहास शिळीमकर याला तिच्या मृत्यूस जबाबदार ठरवले. शिवाय, गितांजलीचे प्रेमसंबंध सर्वांना सांगेल अशी धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, असा आरोपही त्यांनी केला.

यापूर्वीही गितांजलीचे काका लक्ष्मण बर्डे यांनी असेच आरोप करुन त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याचा आरोप शिळीमकर कुटुंबीयांनी केला आहे. या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन देत जयश्री पवार यांनी त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. या प्रकाराने त्रासलेल्या सागरने जेथे गितांजलीने आत्महत्या केली होती, त्याच घरात 29 सप्टेंबरला  गळफास घेतला. दरम्यान, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी लक्ष्मण बर्डे आणि आयर्न राक्षे यांना अटक केली असून उपनिरीक्षक खानविलकर अधिक तपास करत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button