breaking-newsमनोरंजन

प्रेग्नंसीनंतर ‘या’ अभिनेत्रीला मिळेना काम

अभिनेत्री नेहा धुपिया कधीकाळी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जात होती. परंतु प्रेग्नंसीमुळे ती काही काळ या क्षेत्रापासून दूर होती. आता तिला पुनरागमन करायचे आहे. मात्र तिला कामच मिळेना झाले आहे. खुद्द नेहा धुपियाने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ही खंत व्यक्त करुन दाखवली.

“काम करण्याची इच्छा असलेली जगातील कोणतीच व्यक्ती माझ्याकडे काम चालून येईल याची वाट पाहात बसत नाही. ती व्यक्ती स्वत: काम मिळवण्याचे प्रयत्न करते. त्याचप्रमाणे मी देखील काम मिळवण्याचे प्रयत्न केले, परंतु मला अनेकांनी नकार दिला. प्रेग्नंसीनंतर मला कुठल्याच चित्रपटात काम मिळेनासे झाले आहे. सध्या मी वेब सीरीजमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.” अशी खंत नेहाने पिंकविला या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.


नेहाने गेल्या वर्षी अभिनेता अंगद बेदीबरोबर लग्न केले होते. तिला ‘मेहेर’ नामक एक वर्षांची मुलगी आहे. सध्या ती एमटीवी रोडीज या रिअॅलिटी शोच्या १७व्या पर्वात काम करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button