breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रणित हाटे ते गंगा पर्यंतचा खरतड प्रवास …”बायल्या,मुलगी असे टोमणे सहन करावे लागायचे”…

झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मराठी सिरिअल अक्टर्सना डान्स करताना पहायला मिळत आहे. याच शो मध्ये एक गंगा हे नाव चर्चेत आहे. गंगा एक ट्रान्सजेंटर असून तिचं खरं नाव प्रणित हाटे आहे. रिअ‍ॅलिटी शोमुळे गंगा आज घराघरात पोहोचली आहे. मात्र तिचा प्रणित ते गंगापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणापासून तिला अनेक अपमान, टोमणे सहन करावे लागले. डान्सिंग क्वीनच्या मंचावर बोलताना तिने आपला खडतर प्रवास बोलून दाखवला. आपला हा प्रवास सांगताना ती भावूक झालेली पहायला मिळाली.

“हाटे कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला तो मीच. जन्माला मुलगा आला पण तो आत्मा एका मुलीचा होता. मला लहानपणापासून एक सुंदर मुलगी होण्याची इच्छा होती. मी बाहेर कधी मुलांमध्ये खेळायला जायची तेव्हा हा बायल्या आहे असं म्हणत चिडवायचे. माझ्यासोबत कोणी राहायचंही नाही. मला जेव्हा टॉयलेटला जायचं असायचं तेव्हा क्लास सुरु असतानाच जावं लागायचं. मधल्या सुट्टीत गेल्यानंतर माझी फार वाईट अवस्था व्हायची. जर क्लास सुरु असताना टॉयलेटला जाण्यासाठी हात वर केला की अजून दोन तीन हात वर यायचे. ते विद्यार्थी माझ्या मागे यायचे. हे सर्व खूप तणाव निर्माण करणारं होतं. पण मी ते कधी जाणवू दिलं नाही. कारण मला हे नेमकं काय सुरु आहे हेच माहिती नव्हतं,” हे सर्व सांगताना गंगा भावूक झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रृ वाहत होते.

मात्र या खरतड प्रवासात कायम आपल्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यानेच गंगा आज इतक्या खंबीरपणे उभी असल्याचं तिने अभिमानाने सांगितलं… तसंच असे कित्येक प्रणित आणि गंगा आहेत ज्यांना कुटुंबाचा पाठिंबा नाही अशी खंतही बोलून दाखवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button