Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस आयुक्तालय प्रेमलोक पार्कमध्येच होणार ; विद्यार्थ्यांची आम्ही काळजी घेवू – विलास मडेगिरी

शाळेची इमारत भाड्याने देण्यास स्थायीची मंजूरी

पिंपरी – शहरातील नवीन पोलीस आयुक्तालय चिंचवडच्या प्रेमलोक पार्कमधील महात्मा फुले शाळेच्या इमारती होणार आहे. ही इमारती पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्याचा ठरावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती मान्यता देण्यात आली. तसेच हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे वर्ग करण्यात आला.  दरम्यान, त्या शाळेतील विद्यार्थ्याचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता आम्ही घेवू, असा खुलासा विलास मडेगिरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला राज्य शासनाने मंजूरी दिल्यानंतर नवीन इमारती होईपर्यंत तात्पुरस्त्या स्वरुपात महापालिकेकडे प्रशस्त जागे मागणी पोलिसांकडून करण्यात आली. त्यानूसार अजमेरा काॅलनीतील जूनी डॉ. डी.वाय.पाटील शाळेची इमारत, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाची इमारत आणि चिंचवड प्रेमलोक पार्कमधील महात्मा फुले शाळेची इमारतीची पाहणी करण्यात आली होती. त्यापैकी महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयास योग्य असून ती इमारत भाड्याने देण्यात यावे, असे पत्र पोलीस उपायुक्तांकडून 5 मे 2018 रोजी पालिकेला दिले होते. त्यानुसार ही शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची दोन मजली इमारतीचे एकूण भूखंडाचे क्षेत्रफळ 4427.50 चौरस मीटर आहे. त्या इमारतीचा तळमजला 761.84 चौरस मीटर, पहिला मजला 731.29 चौरस मीटर आणि दुसरा मजला 712.00 चौरस मीटर आहे. शाळेसमोरील मोकळ्या मैदानाचे क्षेत्रफळ 3665.16 चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर सात वर्ग खोल्या असून एक सभागृह आहे. त्या ठरावात महापालिका पोलिसांकडून इमारतीचे भाडे किती आकारणार आहे, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

दरम्यान, महात्मा फुले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दळवीनगर येथील रेल्वे लाईनला लागून असलेल्या नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्या इमारतीत विद्यार्थ्यांना स्थलातंरित केल्यानंतर त्यांची गैरसोय होणार नाही, त्याचे शैक्षणिक कोणतेही नूकसान होवू देणार नाही, याबाबत विशेष काळजी घेण्यात येईल, असे विलास मडेगिरी यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button