breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिस आयुक्तांची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातून 24 गुन्हेगारांना केले तडीपार

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सुरु केले आहे. त्यानूसार त्यांनी पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीतील 24 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच तडीपारीची अशी मोठी कारवाई करण्यात आली.

या गुन्हेगारांना केले पुणे जिल्ह्यातून हद्दपार..

पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर कारवाई करुन शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वानंद उर्फ चिक्‍या नागेश खरात (वय 22, रा. थरमॅक्‍स चौक, चिंचवड), संग्राम उर्फ आवळ्या गुरूनाथ भोसले (वय 27), धनंजय उर्फ बबल्या सूर्यकांत रणदिवे (वय 20, रा. दळवीनगर, ओटास्कीम), विकी उर्फ विकास शिवाजी लष्करे (वय 23, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), निखील साहेबराव साठे (वय 26, रा. दळवीनगर, निगडी), आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय 21), अख्तर उर्फ मुन्ना जमालुद्दीन शेख (वय 20), आकाश उर्फ डड्या बसवराज दोडमनी (वय 23), अजय रणजित शेंडगे (वय 19), संघर्ष उर्फ शंक्‍या विष्णू भालेराव (वय 20, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) पिंपरी ठाण्याच्या हद्दीतील अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय 28, रा. मिलिंदनगर , पिंपरी), दिनेश विलास शिंगाडे (वय 25, रा. खराळवाडी, पिंपरी) भोसरी एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील पवन बंडू शिरसाठ (वय 22, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), सचिन डॅनियल खलसे (वय 25, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी), रवी दिलीप गाडेकर (वय 25, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी), पवित्रसिंग जोहरसिंग भोंड (वय 30, रा. खंडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी), इस्तीयाक इनामुल खान (वय 25, रा. संजय गांधीनगर, मोशी) भोसरी ठाण्याच्या हद्दीतील विजय मनबहादूर थापा (वय 22, रा. लांडेवाडी, भोसरी), अभिजीत उर्फ सनी भिमराव खंडागळे (वय 30, रा. गुलाबनगर, दापोडी), सचिन रामदास पवार (वय 28, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) चिंचवड ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्‍वर दशरथ शिंदे (वय 20, रा. नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड), प्रदीप बैलाप्पा कांबळे (वय 19, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड), वशिम मुनीर शेख (वय 22, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माधव उर्फ महादेव रोहिदास गित्ते (वय 25, रा. भगतवस्ती, बालाजीनगर, चाकण) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी (ता.31) दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button