breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पैसे देण्यास नकार दिल्याने 2 मुलांची जन्मदात्या वृध्द पित्याला मारहाण

पिंपरी |महाईन्यूज|

रिटायरमेंटचे पैसे का देणार नाही,’ असे म्हणून दोन्ही मुलांनी जन्मदात्या वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यात वडील गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी (२८ जुलै) सकाळी १०.३० वाजता देहू रोड येथे ही घटना घडली.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. योगेंद्र हिरानंद तेलगू (वय ३२), दिनेश हिरानंद तेलगू (३०, दोघेही रा. पोर्टर चाळ, देहू रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलांची नावे आहेत. या प्रकरणी वडील हिरानंद चंदाप्पा तेलगू (वय ६१) यांनी देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंद एका सरकारी विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना एकत्र काही रक्कम मिळणार आहे. त्या पैशांवर आरोपींचा डोळा होता. हिरानंद यांना मिळणार असलेले पैसे दोन्ही मुलांनी मागितले. त्यास हिरानंद यांनी नकार दिला असता, मुलांनी वडिलांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. यात हिरानंद यांच्या डोक्याला, डोळ्याला, बरगड्यांना दुखापत झाली आहे. देहू रोड पोलिस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button