breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले

नवी दिल्ली – गेल्या १२ दिवसांपासून सातत्याने महागणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आजही वाढ झाली आहे. आज पेट्रोल प्रतिलिटर २० पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर २३ पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ८२.८६ रुपये आणि डिझेलची किंमत ७३.०७ रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. तसेच मुंबईतदेखील पेट्रोलच्या किंमतीत १९ पैशांची वाढ झाल्याने आज मुंबईत पेट्रोलचे दर ८९.५२ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. तर डिझेलसाठी ग्राहकांना ७९.६६ रुपये मोजावे लागत आहे.

दरम्यान, यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी घट झाल्याने इथेही दर कमी होण्याची आशा लोकांना होती. मात्र लोकांना दरवाढीचा झटका केंद्र सरकारने दिला आहे. सरकारने पेट्रोलवर १० रुपये आणि डिझेलवर १३ रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्क वाढवले आहे. याआधी २०१४ साली पेट्रोलवरील कर ९.४८ रुपये प्रतिलिटर होता तर डिझेलवरील कर ३.५६ रुपये होता. नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ पर्यंत केंद्र सरकारने या करांमध्ये ९ वेळा वाढ केली. या १५ आठवड्यांमध्ये पेट्रोलवरील ड्युटी ११.७७ रुपये आणि डिझेलवरील ड्युटी १३.४७ रुपये प्रतिलिटर या दराने वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button