breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरमधील दगडफेकीमागे संघाचा हात – जावेद राणा

पुंछ : काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दगडफेक सुरू आहे. या दगडफेकीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि काही सरकारी यंत्रणांचा हात असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे. दोन दिवसांपूर्वी काश्मीरच्या शोपियांमध्ये शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती.

हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरला भारतीय जवानांनी ठार केल्यामुळेच या दगडफेकीच्या घटना घडत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनांना थेट संघालाच जबाबदार धरले आहे. दगडफेक करणाऱ्यांना संघ आणि सरकारी यंत्रणांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button