breaking-newsपिंपरी / चिंचवड

पेट्रोल, डिजेल दरवाढ म्हणजे भाजपची संघटीत लूट; केंद्र आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध

 

पिंपरी – केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने पेट्रोल, डिजेल दरवाढ केली आहे. महागाई वाढवून जनतेचा खिसा कापला जात आहे. इंधन दरवाढ करून व्यवसायिक आणि भाजपची ही संघटीत लूट आहे. अशा शब्दांत भाजप सरकारचा माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी जाहीर निषेध केला आहे.

 

 याबाबत भापकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपने लोकसभा विधानसभा निवडणुकीत महागाई भ्रष्टाचाराचे मुख्य मुद्दे उपस्थित करून, अच्छे दिनाचे वादे करून, बहुत हुई महंगाईकि मार, आपकी बार भाजप सरकार! अशा लोभस घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्टीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्व नेत्यांनी आश्वासनांची बरसात केली. त्याला जनतेने भुलून सत्तेसाठीचे बहुमत दिले. मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षाच्या काळात “त्या” बाता “भूलथापा” असल्याचे उघडकीस समोर येत आहे, असा आरोप भापकर यांनी केला आहे.

 

केंद्रात मोदी सरकार व राज्यात फडणवीस सरकार आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढ वाढवली जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतीबॅरल १०९.४५ डॉलर अशी होती. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रती लिटर दिल्लीमध्ये ७६ रुपये ६ पैसे, कोलकत्ता येथे ८३ रुपये ६३ पैसे आणि मुंबई पुणे ८३ रुपये ६२ पैसे असे एक लिटर पेट्रोलचे भाव होते. त्यावेळी त्यावेळच्या सरकार विरोधात भाजपचे सर्व नेते कार्यकर्त्यांनी आकाश पातळ एक करून थयथयाट केला. ऑक्टोंबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाची किमंत प्रतीबॅरल ५५ डॉलर अशी असताना दिल्लीमध्ये ७१ रुपये, कोलकत्यामध्ये ७३ रुपये आणि मुंबई पुणे ८० रुपये असा पेट्रोलचा एक लिटरचा भाव होता. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्या तेलाची वारंवार कमी झालेले दर पहाता आज पेट्रोल ४० रुपये लिटरने ग्राहकांना मिळायला हवे, असेही भापकर यांनी मत मांडले आहे.

 

२०१८ च्या सुरुवातीपासून सातत्याने इंधनाची रोजच १० ते २० पैश्यांनी वाढ होत आहे. डिझेलने सोमवारी दर वाढीचा उच्चांक केला. मुंबईत डिझेल ७३.६४ रु प्रती लि. गेले आहे. तर, पेट्रोल ८५.३३ रुपये झाले आहे. पुण्यात डिझेल ७२.६४ रु प्रती लि. आहे. पेट्रोल ८५.३३ एवढे दर झालेले आहेत. मागील ४ वर्षांत पेट्रोल, डिझेल दरवाढीने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्वत:च्या पोस्टरबाजीत गुंतले आहे. पंतप्रधान मोदींचा मोठा फोटो असलेले भलेमोठे पोस्टर्स देशातील सर्व पेट्रोल पंपांवर लावा. नाहीतर इंधनपुरवठा रोखू अशी जबरदस्ती पेट्रोल पंप मालकांना सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. आगोदरच मागील ४ वर्षांत वारंवार पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई व बेरोजगारी निर्माण झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असताना केंद्र व राज्य सरकारने ही पुन्हा पेट्रोल व डिजेल दरवाढ केलेली आहे. त्याचा भापकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button