breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात हेल्मेटसक्ती ; ७ हजार ४९० वाहनचालकांवर कारवाई

पुणे – पुणे शहर पोलीस दलाने १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती राबविण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी हेल्मेट न घालता दुचाकी चालविणा-या ७ हजार ४९० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

या अगोदर वाहतूक नियमांचा भंग केल्यास त्याच्याबरोबर हेल्मेटची कारवाई केली जात होती. ६ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी थेट हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असून संपूर्ण डिसेंबर महिन्यात ३१ हजार ५५७ जणांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या काही दिवसात तर दररोज ३ ते ५ हजार जणांवर कारवाई करण्यात येत होती. ३१ डिसेंबरला ४ हजार ८६२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १ जानेवारीला तब्बल ७ हजार ४९० जणांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे.

त्यातील बहुसंख्य दुचाकी वाहनचालकांकडून ईचालनमार्फत ५०० रुपये दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे़ यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे सध्या हेल्मेट वापरणा-या दुचाकीस्वारांची संख्या रस्त्यावर लक्षणीयरित्या वाढली असून अनेक चौकात सिग्नलला थांबलेल्यांमध्ये पूर्वी हेल्मेट घातलेले २ ते ३ दुचाकीस्वार दिसत असत. आता नेमके उलट चित्र दिसत असून सिग्नलला थांबलेल्यांमध्ये २ -३ दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय दिसून येतात. त्यांच्यावरही सीसीटीव्हीमार्फत कारवाई केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button