breaking-newsपुणे
पुण्यात गेल्या 24 तासात 26 पोलीसांना कोरोनाची लागण
पुणे – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात पुण्यात 26 पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात आतापर्यंत तब्बल 605 पोलीसांना कोरोनाचा लागण झाली असून; त्यापैकी 465 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यात सध्या 137 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात 3 पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाने देशात शिरकाव केल्यापासून देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून महाराष्ट्र पोलीस आपल्या कर्तव्यावर रात्रंदिवस रस्त्यावर उतरली होती. राज्यात पोलीसांनी आपले कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडले असून, राज्यात बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनावर मात करून बहुतांश पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहे.