breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातल्या आठही जागा भाजपकडेच राहतील, चंद्रकांत पाटलांचा दावा

पुणे –  पुणे शहरातल्या आठ विधानसभेच्या जागांवरही चंद्रकांत पाटलांनी सूचक वक्तव्य केलं. ज्या जागा आपल्याकडे नसतात, त्यावर दावा करायचा असतो. पुण्यातल्या आठही जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे त्याबाबत कसला दावा करायचा, असं म्हणत पुण्यातल्या आठ विधानसभेच्या जागा भाजपकडे राहतील, असं सूतोवाच चंद्रकांत पाटलांनी केलं.

पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवाय जागावाटपावर बोलताना पुण्यातल्या जागांबाबत चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलंय.

जागावाटपात काही जागांबाबत विचार केला जातो. कोअर कमिटीच्या बैठकीत ते ठरवलं जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळे लढण्यात धोका आहे, असं आपलं मत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकार स्थापन करायला एक कोटी 70 लाख मतदान लागतं. हे मतदान भाजप महायुतीला मिळेल आणि 220 जागा महायुती जिंकू शकेल, असं पाटील म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का यावर बोलताना, पक्षाच्या कोअर कमिटीने लढायचे आदेश दिले तर लढायला तयार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. कुठला मतदारसंघ हेही कमिटी सांगेल, असंही त्यांनी म्हटलंय. आपण जनतेतून निवडून येत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वारंवार सांगतात. मात्र शरद पवार हे एकाच मतदारसंघातून निवडून येतात. मी पाच मतदारसंघातून निवडून येतो, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button