breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्याचे खासदार गिरीष बापट ‘शकुनीमामा’, शिवसेनेच्या माजी खासदारांची टीका

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने युती धर्म पाळत एकजुटीने काम केले. तरी देखील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीत युती धर्माचे पालन झाले नाही, त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला, असे सांगत शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवाचे खापर भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यावर फोडले आहे. गिरीश बापट हे युतीतील ‘शकुनीमामा’ असल्याची घणाघाती टीका शिवाजी आढळराव पाटलांनी केली आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांनी चाकण येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात गिरीष बापटांना टार्गेट केले. ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर-शिरूर-खेड या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला होता. मात्र, यावेळी शिवसेनेला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, अपयशाचे खापर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी गिरीष बापटांवर फोडले आहे. गिरीष बापट यांच्यामुळे युतीधर्म पाळला गेला नाही. त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हे गिरीश बापट म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी ‘शकुनीमामा’ आहेत, अशा शब्दात आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात टोला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button