breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस मार्चपर्यंत दर शनिवारी रद्द

पुणे | महाईन्यूज

दौंड-सोलापूर रेल्वे मार्गावर दुरुस्ती आणि देखभालीसह तांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक शनिवारी धावणार नाही. त्याचप्रमाणे दोन डेमू गाडय़ाही दर शनिवारी अशंत: रद्द करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आलेले आहे. इंटरसिटी एक्स्प्रेस शनिवार वगळता इतर दिवशी तिच्या नियोजित वेळेत धावणार आहे.

सोलापूर-पुणे डेमू गाडी मार्चपर्यंत प्रत्येक शनिवारी सोलापूर ते कुर्डूवाडीदरम्यान धावेल. म्हणजेच ही गाडी कुर्डूवाडी ते पुणे या दरम्यान अंशत: रद्द राहणार आहे. पुण्याहून सोलापूपर्यंत धावणारी डेमू गाडीही प्रत्येक शनिवारी पुण्याहून भिगवणपर्यंतच सोडण्यात येईल. ही गाडी भिगवण ते सोलापूर दरम्यान रद्द राहील. या दोन्हीही गाडय़ा इतर दिवशी त्यांच्या नियोजित वेळेत पुणे ते सोलापूर दरम्यान धावणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button