breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘कानपिचक्या’

अपक्ष उमेदवार निता ढमालेंचा अर्ज भरतानाचे ‘फोटो सेशन’ अंगलट

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांचीही काढली खरडपट्टी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार निता ढमाले यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी उपस्थिती दर्शवली, ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यावर भर सभेत त्यांनी बनसोडे आणि वाघेरे-पाटील यांची खरडपट्टी काढली.

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रा. जयंत आसगांवर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने चिंचवड येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, कोणी अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार आण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील गेले होते. तसा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मी त्यांना विचारले संजोग तुम्ही कुणाचा अर्ज भरला… तर म्हणाले, मी खाली उभा होतो. अर्ज भरायला गेलो नव्हतो. पूर्वी मी….असे बोललोच नाही, असे म्हणता येत होते. पण, आता तशी परिस्थिती नाही. पक्षाचा अधिकृत उमेदवार अरुण लाड आहेत. त्यामुळे त्यांचाच प्रचार आपण केला पाहिजे. काही उमेदवार आपल्या नेत्यांचे फोटो प्रचारासाठी वापरत आहेत. जाता-जाता फोटो काढला…अशी समजूत कोणी काढू नये, असेही पवार यांनी म्हटले आहे.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांना ‘अल्टिमेटम’?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहेत. पक्षांची संघटनात्मक कार्यपद्धती विस्कळीत झाली आहे. संघटनेमध्ये तरतरी आणली पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर संघटनेत आवश्यक बदल करण्यात येतील, असे स्पष्ट वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर अपेक्षीत बदल केले जातील, असे सूतोवाच उपमुख्यंत्री पवार यांनी केले आहे,  अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button