breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पश्चिम महाराष्ट्रात मागील 24 तासात बाधित रुग्णांची संख्या 84

पुणे विभागातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सातारा याठिकाणी मागील 24 तासात करोनाचे बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे विभागात आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 84 वर पोहचली आहे. यामध्ये पुणे शहर 42, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापुरातील 2 बाधित रूग्णाचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1 हजार 839 होते. त्यापैकी 1 हजार 663 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 176चे अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 544 नमुने निगेटीव्ह आहेत व 84 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्ण बरे झाल्यामूळे त्यांना रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.

दरम्यान, विभागामधील 8 हजार 119 प्रवाशांपैकी 4 हजार 214 प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून, 3 हजार 905 प्रवाशांबाबत फॉलोअप पूर्ण झालेला आहे. आजपर्यंत 10 लक्ष 79 हजार 111 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 48 लक्ष 72 हजार 779 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 441 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button