breaking-newsपुणे

पुण्यातील उद्योजकाचे संशोधन, ‘कोरोना किलर’ इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा लावला शोध

  • कोरोना किलर’ इलेक्ट्रॉनिक उपकरणास आयसीएमआर, एनआयव्ही कडून कार्यक्षमता प्रमाणपत्र                                                                                                     

पुणे – आयनायझेशनच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणूपासून रक्षण करणाऱ्या ‘कोरोना किलर’ या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि. या कंपनीने संशोधित केलेले आणि अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण ठरले आहे. 
कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

कोरोना किलर’ हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते. घर, हॉस्पिटल, शाळा, हॉस्पिटल, गाड्या, विमान, प्रयोगशाळा, क्वारंटाईन सेंटर, कारखाने, मंदिरे अशा कोणत्याही ठिकाणी ते वापरता येते. या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे मान्यता देण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील नायडू रुग्णालयानेही यशस्वी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे.

कोविड रुग्णाचे मास्क, हातमोजे, बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते. पुण्यातील शिवणे भागात असलेल्या या कंपनीमध्ये या उपकरणाचे उत्पादन सुरु असून दररोज २०० उपकरणे निर्मितीची कंपनीची क्षमता आहे. ही क्षमता वाढवून दररोज ७०० पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व नियम पाळून वाहतूकसाठी सरकार सहकार्य करेल अशी अपेक्षा भाऊसाहेब जंजिरे यांनी व्यक्त केली आहे. या उपकरणाचा पुरवठा देशात आणि देशाबाहेरही केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button