breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे-लोणावळा-पुणे लोकलच्या 14 फेऱ्या आज रद्द

पुणे ( महा ई न्यूज ) – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून आज (रविवारी दि. 9)  पुणे ते लोणावळा स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. “ऑटोमेटिक सिग्नलिंग’ प्रणालीच्या तांत्रिक कामासाठी घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे 14 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पुणे-पनवेल पॅसेंजर या गाडीच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ऐन सुट्टीच्या दिवशी लोणावळ्याकडे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा या रेल्वे रद्दच्या निर्णयामुळे खोळंबा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्‍त होत आहे.

आज रेल्वे ब्लाॅक…
सकाळी 7.50 वाजता सुटणारी तळेगाव ते पुणे आणि सकाळी 9.57 वाजता सुटणारी तळेगाव-शिवाजीनगर लोकल रद्द.
सकाळी 8.20, 10.10, दुपारी 2.00, 2.50, 3.40 वाजताची लोणावळा- पुणे लोकल रद्द
सकाळी 6.30, दुपारी 12.15, 1.00, 3.00 वाजता सुटणारी पुणे-लोणावळा लोकल रद्द.
सकाळी 11.20 वाजता सुटणारी शिवाजीनगर-लोणावळा लोकल रद्द.
सकाळी 6.50. 8.57 वाजता सुटणारी पुणे ते तळेगाव लोकल रद्द.
सकाळी 9.05 सुटणारी पुणे-पनवेल आणि दुपारी 2.25 वाजता सुटणारी पनवेल-पुणे पॅसेंजर रद्द.
भुसावळ-पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस (11025, 11026) मनमाड-दौंड मार्गे जाणार.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button