breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महानगरपालिकेकडून थर्टी फर्स्टला खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीवर निर्बंध

पुणे – कोरोना संकटात आज संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्ण टळलेलं नसल्याने बंधने पाळावी लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने 31 डिसेंबरला खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार रात्री 10.45 पर्यंतच खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरु राहील. त्यानंतर कोणतेही खाद्यपदार्थ घरपोच मिळणार नाहीत. त्यामुळे आता पुणेकरांना रात्री 11 नंतर घरगुती बेत आखूनच थर्टी फस्ट साजरा करावा लागणार आहे. याशिवाय पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार 31 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,28,603 वर

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करु नये, असे आवाहन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर 31 डिसेंबरला रात्री दारु पिऊन गाडी चालवू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यामुळे जर कोणी रस्त्यावर दारु पिऊन गाडी चालवली, तर त्याची थेट रुग्णालयात पाठवून रक्त चाचणी केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button