breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे पदवीधरांचे चंद्रकांत पाटील ‘निष्क्रीय आमदार’, ‘आता आमचं ठरलयं’ त्यांना पायउतार करणार

  • महाराष्ट्र स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन फेडरेशनचा आरोप
  • पाचही जिल्ह्यातील पदवीधरांचे प्रश्न प्रलंबित

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे पदवीधर मतदार संघाचे बारा वर्षे प्रतिनिधीत्व करणारे चंद्रकांत पाटील हे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. पाच जिल्ह्यातील निवडून येतो, असा टेंभा मिरविणा-या पदवीधरांसाठी काय काम केलं आहे, पाच जिल्ह्यातील करसल्लागार आणि कर कायद्यात प्रॅक्टीस करणा-या सुमारे 35 हजार कर व्यवसायिकांचे स्वंयम रोजगारीचे क्षेत्र संपवण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे. त्यामुळे ‘आता आमचं ठरलयं’ पदवीधरांचे निष्क्रीय आमदार ठरलेल्या चंद्रकांत पाटलांना पदवीधर मतदार संघातून पायउतार करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन फेडरेशनचे अध्यक्ष अॅड आप्पासाहेब शिंदे यांनी केली आहे.

यावेळी संजय शिंदे, आर. एन. पवार, आर.डी.कुटे, पी.के.महाजन, सी.एम.फुगे आदी उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले की, राज्यात चंद्रकांत पाटील महत्वाचे मंत्री आहेत. ते विधानसभा किंवा विधानपरिषदेचे आमदार नसून पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मागील बारा वर्षात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पदवीधरांच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

तसेच आमचे पदवीधरांचे आमदार हे केवळ सत्तेसाठी भुकलेले असून त्यांच्यामुळे पदवीधर मतदारांचे वाटोळे झाले आहे. शासनमान्य नोंदीत करसल्लागार, वकील, सहकार कायद्यातंर्गत लेखापरिक्षक धोरणे, व्यवसायिकांचे हक्क, अधिकार व जगण्याचा मुलभूत हक्क हिरावून घेतला आहे. यापुढे आपली फुकटची पदवीधरांसाठीची पाटीलकी आम्ही पाचही जिल्ह्यातून घालवण्याची घोषणा करीत आहोत.

दरम्यान, देशात करसल्लागारांची व्यवसायिकता संपवण्यामागे मोठे षडयंत्र आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील 35 हजार पदवीधरांचे कधीही भरुन न येणार नुकसान भाजप सरकारने केले आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा… तुम्ही आम्हा पदवीधर मतदारांच्या खांद्यावर पाय देवून मोठे नेते झालात. आता तुमची खैर नाही. आम्ही ठरवलयं की तुम्हाला पदवीधर मतदारांची पाटीलकी जमली तर नाहीच, पण अधिकारही देता न आल्याने यापुढे तुम्हाला कायमचे पायउतार करण्याचा निश्चित आम्ही केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button