breaking-newsपुणे

पुणे – जुलैतल्या पावसानं मोडला ११९ वर्षांचा विक्रम

पुण्यात मागिल काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार व सततच्या पावसामुळे येथील पावसाचे जुने विक्रम मोडीत निघत, नवा विक्रम नोंदवला गेला आहे. पुण्यात जुलै महिना हा अधिकृतपणे सर्वात जास्त पाऊस झालेला महिना ठरला आहे. एवढेच नाहीतर या महिन्यात आजपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल ११९ वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. असे हवामान विभाग (आयएमडी) पुणे यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

आयएमडीची जेव्हा १९०१ साली स्थापना झाली तेव्हापासून पावसाच्या प्रमाणाची नोंद घेण्यास सुरूवात झाली. म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत पुण्यात एवढ्या मोठ्याप्रमाणात पाऊस झाला नव्हता. पुण्यात एकूण ८२७.७ मीमी पाऊस झाला आहे. याचाच अर्थ शहरात नेहमी पडणाऱ्या पावसापेक्षा दुप्पट प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

यावर्षी पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात महिनाभर सतत पाऊस पडला. साधारणपणे सततच्या मुसळधार पावसातही दहा दिवसांचा किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा खंड पडत असतो. पण यंदा मात्र पुणेकरांना छत्री आणि रेनकोटमध्येच कायम बाहेर पडावे लागले. हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की महाराष्ट्रातील काही भागात १५ ऑगस्ट पर्यंत सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button