breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

पुणे |महाईन्यूज|

“कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये “आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्‍यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्‍टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर; तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. पुणे शहरातही पाच रुग्ण आढळले आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्‍यक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे आदेश बुधवारी सायंकाळी दिले. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांची; तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे.

अधिकाऱ्यांवरील जबाबदारी

  • स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवणे.
  • संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे.
  • स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे.
  • जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे.
  • सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे

कायद्यामुळे काय होणार?
– आवश्‍यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्‍टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार.
– मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तत्काळ कारवाई.

मदतीसाठी येथे करा संपर्क…
– टोल फ्री क्रमांक ः 104
– राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक ः 91-11-23978046

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button