breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आयुष प्रसाद यांच्याकडे!

पुणे । प्रतिनिधी

पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची बदली झाली आहे. त्याठिकाणी नवीन जिल्हाधाकऱ्यांची नियुक्ती होईपर्यंत पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

तरुण आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांची ओळख आहे.

जानेवारी 2020 मध्ये उदय जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. आयुष प्रसाद यांनी यापूर्वी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्या ठिकाणी त्यांनी सेवा व योजनांमध्ये अधिक पारदर्शकता आण्यासाठी महाराष्ट्र ज्ञानमंडळ आणि अकोला जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संगणक प्रणाली तयार केली होती.

अकोला जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी विविध योजनांची गतीने अंमलबजावणी करण्यासह वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रशासकीय निर्णयाची गतीने अंमलबजावणी करणे, अशी त्यांची ओळख आहे.

अकोला येथे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड येथे प्रांत अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button