breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा

मुंबई – भगवान येशू ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केलं. भगवान येशूंच्या जन्मदिनानिमित्तानं साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो.

वाचा :-नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कामावर जीन्स, टी-शर्ट घालून येण्यास बंदी

समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, वर्षअखेरीस येणारा नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचं वातावरण घेऊन येतो.

छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळ यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे, परंतु सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं व सुरक्षिततेचं पालन केलं पाहिजे. स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं कोरोनापासून संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडूया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button