breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

पीएमसीबँकेच्या खातेदारांना दिलासा

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी एचडीआयएल समूहाच्या मालमत्तांवरील जप्ती उठवण्याबाबत येत्या दोन दिवसांत आर्थिक गुन्हे शाखा न्यायालयाकडे परवानगी मागणार आहे. पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासकाने गेल्या आठवडय़ात आर्थिक गुन्हे शाखेकडे तशी विनंती केली होती.

एचडीआयएल समूहाने पीएमसी बँकेकडून कर्ज घेताना तारण ठेवलेल्या आणि अन्य अशा एकूण साडेतीन हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. यापैकी बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करून खातेदार, ठेवीदारांना दिलासा देण्याचा पर्याय पुढे आला होता. त्यानुसार प्रशासकाने लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला या मालमत्तांवरील जप्ती उठवण्याची विनंती केली.

आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रिझव्‍‌र्ह बँकेने नेमलेल्या प्रशासकाचा विनंती अर्ज प्राप्त झाला असून, सध्या या मालमत्तांचे मूल्यांकन सुरू आहे. ते आटोपताच न्यायालयाकडे जप्ती उठवण्याबाबतची परवानगी मागणारा अर्ज केला जाईल. येत्या दोन दिवसांत अर्ज करू शकू, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बॅँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्यास एचडीआयएल समूहाचे प्रवर्तक राकेश वाधवान, त्यांचे पुत्र सारंग आणि अन्य आरोपींना अटक केली. सक्तवसुली संचालनालयानेही या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button