breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रत्नागिरीत एमआयडीसीत केमिकल कंपनींमध्ये स्फोट, दहा कामगार जखमी

रत्नागिरी – रत्नागिरीत लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. एकामागोमाग झालेल्या दोन स्फोटांमध्ये जवळपास दहा कामगार जखमी झाले आहेत. आगीत भाजल्यानंतर उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान कंपनीत काही कामगार अडकल्याची भीती आहे. सध्या आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असून आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

स्थानिक आमदार योगेश कदम यांनी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तसंच गेल्या वर्षभरातील लोटे एमआयडीसीमधील ही पाचवी ते सहावी घटना असून तिथे पाहणी करणं गरजेचं असल्याचं मत योगेश कदम यांनी व्यक्त केलं आहे. भविष्यात यासंबंधी बैठक होण्यासाठी आपण प्रयत्न करु असंही त्यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button