breaking-newsताज्या घडामोडी

पिंपरी विधानसभा : सीमा सावळे ‘तेज रफ्तार’… दिमाखात झाला ‘रोजा इफ्तार!

  • मुस्लिम बांधवांकडून यंदा चांगला पाऊस पडण्यासाठी प्रार्थना
  •  कासारवाडीमध्ये हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्याचे दर्शन

पिंपरी । महा-ई-न्यूज।
पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तीव्र इच्छुक असलेल्या नगरसेविका सीमा सावळे यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सामाजिक कार्यक्रम आणि मतदार संघातील जातीय समीकरणे ओळखून सावळे यांनी ‘रोजा इफ्तार पार्टी’चे जंगी आयोजन केले. वास्तविक, प्रतिवर्षी अशा पार्टीचे आयोजन केले होते. मात्र, यावर्षी मतदार संघातील सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहता विधानसभा निवडणुकीत त्यांची ‘तेज रफ्तार’ राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त गुरूवारी (दि. ३०) कासारवाडीत आयोजित इफ्तार पार्टी उत्साहात पार पाडली. त्यामध्ये सहभागी मुस्लिम बांधवांनी रोजा सोडण्यापूर्वी यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा आणि सर्वांची दुष्काळातून मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थना केली. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच स्थायी समितीच्या माजी सभापती व जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका सीमा सावळे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि जिजाई प्रतिष्ठानकडून पवित्र रमजानच्या महिन्यात दरवर्षी कासारवाडीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. त्यातून एकता आणि शांतीचा संदेश देण्यात येतो. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यानुसार यंदाही कासारवाडीत गुरूवारी इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली.त्यामध्ये हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक विशेषतः मुस्लिम समाजातील महिला व मौलाना मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****


चांगला पाउस पडावा म्हणून प्रार्थना…
इफ्तार पार्टीत रोजा सोडण्यापूर्वी मुस्लिम बांधवांनी यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा, सर्वांची दुष्काळातून मुक्तता व्हावी, समाजात सुख, समाधान आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, उद्योजक कार्तिक लांडगे, माजी उपमहापौर व नगरसेविका शैलजा मोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती व नगरसेविका सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, शर्मिला बाबर, हिराबाई घुले, नगरसेवक शीतल शिंदे, तुषार हिंगे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, प्रभाग स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, नबिल पानसरे, संजय शेंडगे, तुकाराम पडवळे, संजीवनी पांडे, शोभा भराडे, सारिका पवार, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, अजिज शेख, नेहूल कुदळे, किशोर हातागळे, नासीर शेख, मौलाना इनायत करीम आदी उपस्थित होते.
****
आमदार लक्ष्मण जगताप यांच्याही शुभेच्छा
भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच स्थायी समितीच्या माजी सभापती व जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका सीमा सावळे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्या हस्ते पूर्ण पोषाख देऊन मौलानांचा सत्कार करण्यात आला.तसेच रोजेधारकांचाही त्यांनी गौरव केला व फळांचे वाटप केले. जिजाई प्रतिष्ठान व नगरसेविका सीमा सावळे यांनी समाजात एकोपा अबाधित राहावा यासाठी विविध उपक्रम राबवावीत अशी अपेक्षा मौलानांनी व्यक्त केली. सीमा सावळे यांनी त्यांना प्रतिसाद देत आमची संस्था समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करेल, अशी ग्वाही दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button