breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर कचरामुक्त करा – पार्थ पवार

  • महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांची घेतली भेट

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात कच-यांची समस्या गंभीर बनली आहे. येत्या पंधरा दिवसात शहर कचरामुक्त, दुर्गंधीमुक्त झाले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांनी व्यक्त केले. याबाबत महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची भेट घेवून शहर स्वच्छ व सुंदर झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

पिंपरी येथील भाजी मंडईत आज (सोमवार) राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, राजू मिसाळ, युवा नेते शेखर ओव्हाळ, नगरसेविका उषाताई वाघेरे पाटील, निकिताताई कदम, गणेश भोंडवे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवा नेते ऋषीकेष वाघेरे पाटील,  व्यापारी सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, खजिनदार संजय लंके, सरचिटणीस अमोल भोईटे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा कविता खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरीतील भाजी मंडईत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरात कचऱ्याचे जागोजागी ढिग साचले आहेत. शहरात कच-याची साफसफाई होत नाही. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट पार्थ पवार यांच्या शिष्टमंडळाने घेतली, त्यामध्ये शहरातली आठ ही क्षेत्रीय कार्यलयांमध्ये स्वच्छता ही दररोज झालीच पाहिजे, कचरा संकलित करणाऱ्या नवीन गाड्याची उंची जास्त असल्यामुळे त्यांची उंची कमी करण्यात यावी, जेणेकरून महिलांना कचरा टाकण्यास अडचण येणार नाही. प्रत्येक कचऱ्याच्या गाडीवर एक मदतनीस नियुक्त करावा, शहर हे कोणत्याही परिस्थितीत कचरा मुक्त झालंच पाहिजे. एकेकाळी बेस्ट सिटी, स्वच्छ शहर असलेल्या पिंपरी चिंचवड आज पिछाडीवर पडले आहे. याबाबत सुधारणा करावी, असे मत पार्थ पवार यांनी मांडले.

प्रत्येक रविवारी शहरातील वेगवेळ्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वच्छता मोहिम ही राबविण्यात येईल, असे मत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मांडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button