breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील जून्या मिळकतींना 1 एप्रिलपासून दुप्पट कर आकारणी

महासभेने प्रस्ताव नामंजूर केल्यास आयुक्तांच्या अधिकारात कर आकारणी लागू

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरातील नव्या आणि जून्या मिळकतींच्या मालमत्ता करात प्रचंड तफावत आहे. नवीन इमारतीपेक्षा जून्या मिळकतींना कर आकारणी नगण्य असून सोयी-सुविधांचा लाभ समसमान आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील जून्या मिळकतींच्या मालमत्तांच्या कर योग्य मुल्यात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. दरम्यान, याबाबत महासभेपुढे प्रस्ताव ठेवला आहे, तो प्रस्ताव नामंजूर केल्यास माझ्या अधिकारात 1 एप्रिलपासून जून्या इमारतींचा कर दुप्पटीने वाढवणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे उपस्थित होते.

आयुक्त हर्डिकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे दीड लाखाहून अधिक मिळकतींना मालमत्ताकर लागू आहे. त्यात जून्या मिळकतींचा देखील समावेश आहे. महापालिका हद्दीतील जून्या मिळकतींना मिळकतकर फारच कमी आहे. त्या तुलनेत नवीन इमारतींना मालमत्ता कराची आकारणी अधिक आहे. परंतू, शहरातील जून्या-नव्या मिळकतीधारकांना महापालिकेच्या सोयी-सुविधा सारखा असून त्याचा लाभ समप्रमाणात घेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात 2007 पुर्वी मिळकतधारकांना दुप्पट कराची वाढ लागू केली होती. त्यानंतर आजपर्यंत कर योग्य मुल्य वाढलेले नाही. तर 1996 मध्ये कर योग्य मुल्य वाढविले नाही. त्यामुळे कर योग्य मुल्य वाढवण्याचा प्रस्ताव येत्या 20 फेब्रुवारीच्या महासभेपुढे ठेवला आहे. त्या प्रस्तावात कर योग्य मुल्य दर बदलण्याचा महासभेला अधिकार आहे. मात्र, त्यानी हा प्रस्ताव नामंजुर केला. तर हा कर योग्य मुल्य वाढविण्याचा अधिकार माझ्या कक्षेत असल्याने 1 एप्रिलपासून तो जून्या मिळकतधारकांना दुप्पटीने वाढवून लागू करणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button