breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल होणार

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पवना नदीमध्ये गेल्या महिन्यात माशांच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी १८ डिसेंबर रोजी नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी महापालिका अधिकाऱ्याच्या उपस्थितीत घेतले आहेत. हे पाणी दूषित असल्याचा अहवाल आल्यास महापालिकेवर न्यायालयात खटला दाखल होण्याची शक्‍यता आहे.

या पाण्यांच्या नमुन्याची तपासणी प्रयोगशाळेत सुरू आहे. त्याचा अहवाल काही दिवसात येणार आहे. या पाण्याच्या नमुन्यांमध्ये कोणते घटक आहेत? ऑइल, ग्रीस त्यामध्ये मिसळले जाते का? याची तपासणी करण्यात येणार, असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिसेंबरमध्ये पवना नदीमध्ये केजुबाई बंधाऱ्याच्या परिसरात अचानकपणे माशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराचे सर्वेक्षण केले होते. हा प्रकार नेमका कशामुळे घडला? याचा शोध घेतला होता. त्यावेळेस सहा ठिकाणी नाल्याचे पाणी थेट नदीमध्ये मिसळले जात, असल्याचे आढळले होते.

थेरगाव, रावेत, ताथवडे या परिसरात कोणतीही औद्योगिक वसाहत नसून या भागामध्ये रहिवासी सोसायट्यांची संख्या अधिक आहे. येथील सांडपाणी नदीमध्ये मिसळत असल्यामुळे या माशांचा मृत्यू होत, असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यासंदर्भात नाल्यामधून थेट नदीत जाणारे पाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळवावे, अशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने त्यासंदर्भात उपाययोजना करण्याची आवश्‍यकता होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button