breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलिसांची दबंगगिरी; आठ अवैध धंद्यांवर छापा

पिंपरी | प्रतिनधी

पिंपरी-चिंचवड मधील पोलिसांचा आता अवैद्य धंदे करणाऱ्यांवर चांगलाच धाक बसला आहे. मंगळवारी एकाच दिवसात पोलिसांनी आठ अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे. या मध्ये अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. पोलिसांच्या या दबंगगिरीने अवैद्य काम करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कडक भुमिकेमुळे पोलीस खाते देखील चांगलेच कृतीत उतरले आहे. सध्या दररोज अवैध धंदयांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. भोसरी, चाकण, पिंपरी, निगडी, कुदळवाडी आदीसह अनेक भागात हि कारवाई केली जात आहे.

निगडी पोलिसांनी कल्याण मटका हा ऑनलाईन जुगार चालणा-या एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातील दोघेजण मोबाईलवर ऑनलाईन जुगार घेत होते. त्यांच्याकडून 15 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी कुदळवाडी येथे रवी रंजन वजन काट्याजवळ देशी दारू आणि विदेशी बिअर दारू विकणा-या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन हजार 314 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. शिरगाव पोलिसांनी बेकायदेशीरपणे दारू विक्री करणा-या एकाला अटक केली. त्याच्याकडून टॅंगो पंच कंपनीच्या 260 रुपयांच्या पाच बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

भोसरी पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या तीन लॉजवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.

चाकण येथे दारूभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी 82 हजार रुपयांची गावठी दारू बनविण्याचे रसायन जप्त केले. या मध्ये एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपरी परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केले. त्या सर्वांना अटक करून पोलिसांनी जामिनावर सोडले आहे. आरोपींकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button