breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये फेरीवाला ‘ना घर का, ना घाट का’, आयुक्तसाहेब… हाॅकर्स झोन निश्चितीवर तोडगा कधी?

बायोमेट्रीक सर्व्हे, सुमारे सहा हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र वाटप, मग माशी शिंकते कुठे?

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने हाॅकर्स झोन निश्चित केले. शहरातील फेरीवाला, हातगाडीवाला, पथारीवाला आदींचे सर्व्हे करुन त्यांचे बाॅयोमेट्रीक केले. त्यानंतर सुमारे 5 हजार 923 फेरीवाल्यांना पात्र केल्यावर त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मात्र, गेल्या पाच वर्षात हाॅकर्स झोन निश्चितीवर तोडगा न काढल्याने फेरीवाला ना घर का… ना घाट का अशी अवस्था झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान, पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाकडून फेरीवाल्यांना कारवाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आयुक्तसाहेब… फेरीवाल्यांवर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर येत आहे. महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणांची योग्य अमंलबजावणी न केल्याने ही समस्या अधिक गंभीर होवू लागली आहे. महापालिकेने फेरीवाल्यांचे क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रभागनुसार पात्र फेरीवाल्यांनी बायोमेट्रीक सर्वे पूर्ण केला आहे. त्यात शहरामध्ये 9 हजार 25 फेरीवाल्यांची नोंद आहे. त्यापैकी 5 हजार 923 फेरीवाल्यांना बायोमेट्रीक ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप केलेले आहे. परंतू, शहरात 250 हून अधिक जागा निश्चिती करुनही हाॅकर्स झोन निर्माण केलेले नाहीत.

महापालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांबाबत पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा वापर करुन नव्याने सर्व्हेचा विचार सुरु केलेला आहे. त्यात फेरीवाल्यांचे स्वतंत्र अॅप बनवण्याचा देखील विचार सुरु आहे. त्यात हे बायोमेट्रीक कार्ड आधार कार्डशी लिंक असेल. अर्जात फेरीवाल्याने ज्या व्यवसायांचा उल्लेख केला आहे, तसेच तो ज्या भागात बसणार आहे. त्याचा उल्लेख केला जाणार आहे. त्यामुळे बायोमेट्रीक कार्डची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या परवाना निरीक्षकांना मशिनही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या मशिनच्या माध्यमातून ते प्रत्येक फेरीवाल्याचे कार्ड तपासणार आहेत. जर बायोमेट्रीक कार्ड दुसऱ्याच्या नावावर आहे, असे आढळल्यास तेथील फेरीवाल्यांच्या साक्षीने पंचनामा करून त्याचे कार्ड जप्त केले जाणार आहे.

ज्यांच्या नावावर हे कार्ड असेल त्याला त्याची आई, बहीण, भाऊ अशाप्रकारे कुटुंबातील कुणालाही या कार्डवर व्यवसाय करता येईल. मात्र याव्यतिरिक्त कोणी आढळल्यास त्याचे कार्ड रद्द केले जाईल. तसेच हे कार्ड ज्या जागेसाठी दिले जाईल. त्याच जागेवर व्यवसाय करण्याचे बंधन असणार आहे. सद्यस्थितीत अर्जांची छाननी करून तसेच संगणकीय माहिती संकलित करून निकषांच्या आधारावर पात्र फेरीवाल्यांची नोंदणी सुरु केली जाईल. या फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

दरम्यान, येत्या दोन दिवसात शहरातील फेरीवाला धोरणाबाबत बैठक होणार आहे. त्या पुर्वी केलेल्या सर्व्हेच्या आधारे पात्र ठरलेल्या व बाॅयोमेट्रीक पुर्ण केलेल्या फेरीवाल्यांना अगोदर प्राधान्याने निश्चित केलेल्या जागा देणे आवश्यक आहे. मात्र, त्यावर कोणताही विचार न करता, पुन्हा फेरीवाल्यांचे सर्व्हे करुन अजूनही किती दिवस हा प्रश्न प्रलंबित ठेवणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

प्रभाग पात्र फेरीवाले बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण केलेले फेरीवाले जागा निश्चिती
अ 1883 1174 62
ब 1169 903 34
क 1733 1209 26
ड 1179 800 28
इ 1369 998 73
फ 1692 998 73
एकूण 9025 5923 246

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button