breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती व व्यवसायिक तीन महिन्याचे वीजबील माफ करा : प्रदीप गायकवाड

– उर्जामंत्री नितीन राउत यांना निवेदन

– उद्योजकांसह कामगार वर्ग अडचणीत

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर

घरगुती व व्यवसायिक वीजग्राहकांची वीजबील माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी व्यापारी सेलचे पिंपरी-चिंचड शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.

याबाबत उर्जामंत्री नितीन राउत यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की,

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक शहर असुन याठिकाणी नागरिक संपूर्ण पणे औद्योगिक, उद्योगांवर वर अवलंबून आहे. याठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर रहिवाशी आहे. सध्या करोना सारख्या महामारी मुळे संपूर्ण देशात लाँकडाऊनची स्थिती आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर रेडझोन मध्ये असल्याने याठिकाणी सर्व एमआयडीसी, उद्योग ,व्यापार, गेली दोन महिने पुर्णपणे बंद आहेत. यामुळे उद्योजकासह कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी किती अवधी लागेल हे सांगता येत नाही. उद्योजक ,व्यापारी , कामगार आर्थिक संकटातून जात असताना आपण या लाँकडाऊनच्या काळातील म्हणजे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यातील  महिन्यातील मिटर रिडींग  घेण्यात आले नाही यामुळे सर्व ग्राहकांना अंदाजे विजबिल आकारण्यात आले आहे हे वीजबिल सरसकट माफ करावे. . त्यात घरगुती, व्यवसायिक स्वरूपात असलेल्या वीजबिलाचा समावेश करण्यात यावा. जुन महिन्यापासून चे लाईटमिटर रिडींग घेवून विजबिल आकारणी करण्यात यावी व पिंपरी चिंचवड शहरवासीयांना आर्थिक संकटात मदत करावी, असेही प्रदिप गायकवाड यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button